‘एकता मेकॅनिक असोसिएशन’ची २० वर्षांची सामाजिक बांधिलकी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रगण्य सामाजिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एकता रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन’च्या वतीने यंदाही पीर बाबरशेख उरुसानिमित्त भाविकांसाठी मोफत ‘ब्रेकडाऊन सर्व्हिस कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी गाडी बंद पडल्यास किंवा पंक्चर झाल्यास भाविकांना ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
२००६ साली स्थापन झालेल्या या असोसिएशनने २०२६ पर्यंतच्या आपल्या २० वर्षांच्या प्रवासात सामाजिक बांधिलकी जपली आहे. केवळ व्यवसाय न पाहता समाजाचे देणे लागते या भावनेतून संघटनेने एक आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे. याच परंपरेचा भाग म्हणून यंदाही उरुस यात्रेसाठी येणाऱ्या दुचाकी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी संघटनेचे मेकॅनिक रात्रभर रस्त्यावर सेवा देण्यासाठी तैनात असणार आहेत.
हा सेवा कॅम्प टेभ्ये पूल, रत्नागिरी येथे उभारण्यात येणार असून, धारेपासून ते हातिस दर्गा मार्गावर ही सेवा उपलब्ध असेल. सोमवार दिनांक २ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहिल. गाडी बंद पडणे, पंक्चर काढणे किंवा इतर तांत्रिक मदत मोफत दिली जाईल.
प्रवासात गाडी बंद पडल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास भाविकांनी गणेश शेंडे (९४२२४३०६१०), समीर शेट्ये (९४२११७९६३१), महेश पालकर (९४०४७६३५११), दिलीप शिंदे (७३५०४५७०४०), शब्बीर काझी (९९६०२४६५७५), मयुरेश यादव (९६६५१४८८४१), बावा शिवलकर (९८६००२६५९९), जितेंद्र भूते (७०२०७८९५७६) या ‘सेवेकरी मेकॅनिक’शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.









