रत्नागिरी:- राज्यातील शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारच्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेत रत्नागिरी जिल्ह्dयातील एकूण 54 जिल्हा परिषद व नगर परिषदेतील पाथमिक शाळांचा समावेश आहे. या शाळांसाठी पुढील 5 वर्षांत सुमारे 1 कोटी 88 लाखांचा निधी मिळणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पीएम श्री योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शाळा अद्यावयत करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये जवळपास पंधरा हजार शाळांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे म्हंटले होते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातही ही योजना राबवली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात 816 शाळा विकसित करण्यात येणार आहे.
पीएम श्री योजना राज्यात राबविण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यामध्ये शाळांचे धोरण ठरविणारे आणि आदर्श असणारे शिक्षक यामध्ये इतर शाळांना मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. आदर्श आणि धोरण ठरविणाया व्यक्ती आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षण याबरोबरच अध्ययन आणि संज्ञानात्मक विकास यामध्ये समावेश असणार आहे. पुढील काळाची गरज ओळखून यामध्ये कौशल्य विकसित कसे करता येईल यावर भर दिला जाणार आहे.