रत्नागिरी:-चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे काळकाई मंदिराजवळील कॅनॉलमध्ये गुरूवारी सायंकाळी पिंपळीखुर्द बाजारपेठेतील दोन अल्पवयीन युवक आंघोळीसाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडून वाहून गेले होते. बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह रविवारी सापडला आहे.
दरम्यान शनिवारी सायंकाळी खेर्डी रेल्वे पुलाखाली वाशिष्ठी नदी पात्रात दिनेश चव्हाण या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. तर बेपत्ता असलेल्या गौरव पेडणेकर या युवकाचा मृतदेह काल रविवारी पेठमाप फरशीजवळ वाशिष्ठी नदीपात्रात आढळला. पिंपळी खुर्द बाजारपेठेतील दिनेश जितेंद्र चव्हाण व गौरव रमण पेडणेकर हे दोघे गुरूवारी सायंकाळी पिंपळी कॅनॉलमध्ये आंघोळीसाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडून वाहून गेले हाेते.









