रत्नागिरी:- तालुक्यातील पावस येथे स्वयंपाक करताना भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना १६ मार्च २०२४ रोजी घडली. प्रणिता प्रकाश गुरव (६०, रा. पावस गुरववाडी) असे महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद पूर्णगड पोलिसांत करण्यात आली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिता या पावस येथील घरी स्वयंपाक करत असताना अंगावरील मेक्सिने अचानक पेट घेतल्याने भाजून जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी प्रथम जिल्हा शासकीय रूग्णालय व नंतर केईएम मुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान प्रणिता यांचा मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.