रत्नागिरी:- तालुक्यातील पावस येथे तीन ठिकाणी विनापरवाना मद्यपान करणार्या तिघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सोमवार 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 6.30 वा.कालावधीत करण्यात आली आहे.
श्रेयस विठोबा जाधव (26, रा.नाखरे, खांबवाडी, रत्नागिरी),मनिष अनंत गुरव (35, रा.नाखरे गुरववाडी, रत्नगिरी) आणि प्रसन्न चंद्रकात लाड (31, रा.मावळंगे नातुंडे, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.यातील श्रेयस जाधव हा एसटी स्टँडच्या पाठीमागील बाजुस सार्वजनिक ठिकाणी मनिष गुरव हा पावस रिक्षा स्टँडजवळी भडकंबा मैदानात आणि प्रसन्न लाड हा गौतमी नदीवरील पुलाखाली विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासाठी बसलेले असताना ही कारवाई करण्यात आली.









