पावस:- पावस बाजारपेठ येथील प्रौढ भाजल्यामुळे उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विश्वनाथ तुकाराम भोसले (५०, रा. पावस-बाजारपेठ, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) रात्री साडेदहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विश्वनाथ हे पावस बाजारपेठ येथे शेडमध्ये एकटेच रहात होते. त्या ठिकाणी ते भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले. उपचारासाटाी त्यांना रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.









