रत्नागिरी:- पावस नाखरे मार्गावर एसटी बसने चारचाकीला धडक देत दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 जून रोजी दुपारी 12 वा. च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक प्रशांत पाटील यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर भुजंग हाके (32, गंगाखेड, परभणी, सध्या एसटी डेपो रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील एसटी. बस घेवून नाखरे – खांबट ते पावस मार्गे जात होते. यावेळी पावस ते गावडे आंबेरे अशा अशा जाणार्या चारचाकी गाडीला समोरुन धडक दिली. यामध्ये दोन्ही गाडयांचे नुकसान झाले. त्यानुसार गाडी हयगयीने, अविचाराने चालवून दोन्ही गाडयांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हाके याच्यावर भादविकलम 279 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.