रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीने आपली उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. या घोषणेनंतर लागलीच पावस जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उमेदवार ॲड. महेश मांडवकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात अधिकृत प्रवेश केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना पालकमंत्री ना. उदय सामंत आणि जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि मांडवकर यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पहिल्या यादीच्या घोषणेनंतर महायुतीने प्रचारात आघाडी घेतली असून, जिल्ह्यात शंभर टक्के यश मिळेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.









