रत्नागिरी:- तालुक्यातील मिरजोळे आणि पाली येथे बिबट्याचा वावर वाढला आहे. दोन्ही ठिकाणी बिबट्याने वासरांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरानजीक असणाऱ्या मिरजोळे पाडावे वाडी येथील विनायक जोगळेकर यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. रत्नागिरी शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये असणारा बिबट्याचा वावर यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील पाली गावातील बाजारपेठेत काल मध्यरात्री दीड च्या सुमारास प्रवीण राऊत यांच्या गोठ्यातील पाड्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारले. वनपाल गौतम कांबळे, पोलीस पाटील अमेय वेल्हाळ यांनी आज सकाळी या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला आहे.









