रत्नागिरी:- तालुक्यातील पाली बाजारपेठेतून बेकायदेशीरपणे तीन गायींची वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सायवाल जातीच्या दोन, गीर जातीची एक गाय आणि बोलेरो पिकअप असा एकूण ८ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी रात्री १२ वाजता करण्यात आली.
आकाश लक्ष्मण पवार (रा. मंगळूरपीर, वाशिम), सुरेश लक्ष्मण देसाई (रा. वैभववाडी, सिंधुदुर्ग) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सिद्धेश बाबुराव दुरकर (३१, रा. पाली बाजारपेठ, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे.