रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदीर येथील प्रसिद्ध पान व्यावासयिक गजानन टिळेकर (४८) यांनी नाचणे येथील तळयात उडी मारुन आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडली आहे. मंगळवारी दुपारी हि घटना घडली.
मारुती मंदिर येथे गेले अनेक वर्ष गजानन टिळेकर यांचे पान शॉप आहे. वडिलांपासून टिळेकर कुटुंबीय या व्यावसायात होते. लॉकडाऊनमुळे त्यांचे शॉप बंद होते. तेव्हापासून ते नैराश्येत होते. मंगळवारी दुपारी अचानक ते घरातून बाहेर पडले. ते बराच वेळ घरी परत न आल्याने त्यांची शोधाशोध सुरु होती. याचा कालावधीत ते नाचणे येथील तळयात पडलेल्या स्थितीत आढळून आले.घटनेची माहिती मिळताच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.
गजानन टिळेकर हे मारुती मंदिर परिसरात लोकप्रिय होते. सर्व व्यापाऱ्यांशी त्यांचे जवळचे संबध होते. मारुती मंदिरात होणार्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या अकाली जाण्याने व्यापाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.