रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर पानवल येथे दोन कारची समोरासमोर धडक झाली. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता हा अपघात घडला. या अपघातात 7 जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. यातील एकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून व अन्य एकाला कोल्हापूर याठिकाणी हलवण्यात आले आहे. अपघातानंतर जवळपास अर्धातास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.
हि घटना शुक्रवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याचा सुमारास घडली. पानवल येथे हुडांई वेरना व मारुती 800 या गाडयांमध्ये समोरासमोर धडक बसली. वेरना हि गाडी सावर्डे याठिकाणाहून रत्नागिरी कडे येत होती तर मारुती 800 कार रत्नागिरीहून सावर्डेकडे जात होती.यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तात्काळ धाव घेतली व वाहतूक कोंडी बाजुला केली. अन्जन कारांडे (रा.चरवेली), हर्ष मोडक (सावर्डे), राहुल मोहिते (सावर्डे), कौस्तुभ सावंत (सावर्डे), सुमित इंदुलकर (संगमेश्वर), संकेत चव्हाण (सावर्डे), विनोद सुवारे (लांजा) हे जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्याची प्रकिया सुरु होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल उदय वाजे करीत आहेत.









