पाणीबाणी संपणार! शीळ धरणातून पाणी उपशाला सुरुवात

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणार्या पÌलोटींग जॅकवेलसह पंपहाऊसचे काम पुर्ण झाले असून रविवारी सायंकाळनंतर पाणी उपशाला सुरुवात झाली आहे. रविवारी रात्रीउशीरापर्यंत साळवी स्टॉप येथील पाणी साठण टाकी भरल्यानंतर सोमवारी सकाळी संपुर्ण शहराला नियमित पाणी पुरवठा सुरु होणार आहे. त्यामुळे पाण्याची रत्नागिरीकरांची प्रतिक्षा आता अखेर संपली आहे.

शहराला पाणी पुरवठा करणार्या शीळ धरणावरील जॅकवेल गेल्या गुरूवारच्या मध्यरात्री कोसळली. त्यानंतर शहराला पाणी पुुरवठा होत नव्हता. काही दिवसानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास मंहामंडळाडून जे पाणी मिळत होते ते शहरात दिले जात होते. परंतु या पाणी पुरवठ्यात वेळापत्रकाची नियमितता नव्हती. त्याचबरोबर फारच कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी मिळत होते. इमारतीतील रहिवाशी, हॉटेल, दवाखान्यांमध्ये टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत होते. नगर परिषदेकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.

पाणी टंचाईची गंभीरता ओळखून उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या धरणातील पाणी देण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर मुख्याधिकारी तुषार बाबर आणि पाणी विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी जॅकवेलचे काम युद्धपातळीवर व्हावे यासाठी जोर लावला. नवीन नळपाणी योजनेच्या ठेकेदाराकडून या योजनेतील २५० अश्वशक्तीचे दोन पंप आणि नवीन ठेकेदार नेमून त्याच्याकडून २० अश्वशक्तीचे चार पंप उभारून घेतले.

फ्लोटींग जॅकवेलसह पंपहाऊसचे काम रविवारी पुर्ण झाले आहे. त्यामुळे रविवारी रात्रीपर्यंत साळवी स्टॉप येथील पाणी साठवण टाकी भरणार आहेत. त्यामुळे आज सोमवारी रत्नागिरी शहराला सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांची पाण्याची प्रतिक्षा संपणार आहे.