रत्नागिरी:- देवरुख पाटगाव येथील तरुणीने अज्ञात कारणातून राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. ही घटना मंगळवार 24 जून रोजी सकाळच्या सुमारास घडली.
सुनिता लाखण राठोड (21,रा.देवरुख पाटगाव) असे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिने अज्ञात कारणातून राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. काहीवेळाने तिला अस्वस्थ वाटू लागल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिला प्रथम देवरुख ग्रामीण रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.