पाचव्या मजल्यावरून पडलेल्या कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- पाचव्या मजल्यावरुन पाय घसरुन पडलेल्या वृध्द कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवार 5 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वा. बंदर रोड येथील ओंकार विश्व अपार्टमेंट मध्ये घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रामचंद्र बारक्या कदम (59,रा.वरची निवेंडी बौध्दवाडी,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे.शनिवारी दुपारी ते बंदर रोड येथील ओंकार विश्व अपार्टमेंंटच्या पाचव्या मजल्यावर काम करत होते.त्यावेळी पाय घसरुन ते खाली जमिनीवर पडल्याने गंभिर जखमी झाले.त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेेले असा तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी रामचंद्र कदम यांना तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.