रत्नागिरी:-शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम करणार्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता शिष्यवृत्तीच्या परीक्षेबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात ऑनलाइनद्वारे शाळा सुरू झाल्या असल्या तरीही अद्याप शिष्यवृत्ती परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेत आहेत. गेल्या वर्षभरापासूनशाळाबंद असल्यातरी ऑनलाइन, ऑफलाइनद्वारे विद्याथ्यांची तयारी सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्त पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा 28 एप्रिल या एकाच दिवशी घेण्यात येणार होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा 23 मे रोज घेण्यात येईल, असे मार्चच्या अखेरीस जाही करण्यात आले. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्य प्रादुर्भावामुळे 23 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे परीक्षा परिषदेने 10 मे रोजी स्पष्ट केले. त्यानंतर जून महिन्याच तिसरा आठवडा संपत आला, तरीही शिष्यवृर्त्त परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. स्पर्धा परीक्षांसाठी जिल्हा परिषदमध्ये स्वतंत्र गुणवत्ता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यांच्यामाफत विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. शिष्यवृत्ती परीक्षापण या गुणवत्ता कक्षात येते. प्रथम पाचवी व आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसवण्याचा निर्णय या कक्षामाफत शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षेला पाचवीतील 7 हजार 750 तर आठवीचे 3 हजार 415 विद्यार्थी बसले आहेत.