रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षेचा रत्नागिरी जिह्याचा निकाल गुरूवारी जाहीर झाला आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही विभागांतील विद्यार्थ्यांची कामगिरी जिह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. श्रीपाद चव्हाण आणि राजनंदिनी सावंत जिल्ह्याचे मानकरी ठरले आहेत.
5 वी शिष्यवृत्ती परीक्षा: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यश
इयत्ता 5 वी च्या ग्रामीण विभागाच्या गुणवत्ता यादीत रत्नागिरी जिह्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. श्रीपाद विठोबा चव्हाण याने 94.66 टक्के गुणांसह जिह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. अद्विक विजय साखरे 93.33 टक्के गुणांसह दुसऱया स्थानावर राहिला. तनुजा दत्तात्रय वाघमारे (92.00) तिसऱया क्रमांकावर आहे.
याशिवाय, तनिष्का दत्तात्रय चांडम (91.33 टक्के), वैभवी सुजित देवरुखकर (90.66 टक्के), आयुष बाबासाहेब बनसोड (90.00 टक्के) आणि स्वरा सागर पाटील (90 टक्के) यांनीही 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून जिह्याचे नाव उंचावले आहे. राष्ट्रीय ग्रामीण संवर्गातून ( एाt ण्दा्: ं ) एकूण 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत निवडले गेले आहेत. ग्रामीण सर्वसाधारण संवर्गात (एाt ण्दा्: व्) देखील अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले, ज्यात आदर्श संदीप पाटाडे (84.66 टक्के) आणि प्रज्वल बाळाजी बोंबाळे (84.56 टक्के) यांचा समावेश आहे.
8 वी शिष्यवृत्ती परीक्षा: ग्रामीणसह शहरी भागातील उल्लेखनीय कामगिरी
इयत्ता 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेतही रत्नागिरी जिह्याच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. ग्रामीण विभाग: राजनंदिनी संदीप सावंत हिने 92.66 टक्के गुणांसह जिह्यातून प्रथम स्थान पटकावले आहे. तर अर्णव राजकुमार मगदूम (90 टक्के) आणि तेज राजेश भगणे (90 टक्के) यांनी संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे. दक्ष दिनेश गिजाई याने 90 टक्के गुण मिळवले आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण संवर्गातून (एाt ण्दा्: ं) एकूण 10 विद्यार्थी निवडले गेले आहेत. ग्रामीण सर्वसाधारण संवर्गात विश्वजीत रोहिदास केंद्रे आणि निशाद संदीप मोहिते यांनी 86.66 टक्के गुणांसह आघाडी घेतली आहे.
शहरी विभागाच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये, रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल मधील एका विद्यार्थ्याने 96 टक्के गुण मिळवून राज्यात तिसरे स्थान पटकावले आहे. एकूणच, रत्नागिरी जिह्याच्या विद्यार्थ्यांनी 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण आणि शहरी दोन्ही विभागांतून उल्लेखनीय कामगिरी करत जिह्याची मान उंचावली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इयत्ता पावी शिष्यवृत्ती निकाल
-राज्यस्तरावर गुणवत्ता यादी (ग्रामीण): श्रीपाद विठोबा ााव्हाण (जि.प.केंद्रशाळा क्र.1, रायपाटण राजापूर), गुणवत्ता क्रमांक 8 वा., अद्विक विजय साखरे (जि.प.शाळा पोसरे खुर्द,), गुणवत्ता क्र. 10 वा.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती निकाल
राज्यस्तरावर गुणवत्ता यादी (ग्रामीण): राजनंदिनी संदीप सावंत (ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव-खेड), गुणवत्ता क्रमांक 7., अर्णव राजकुमार मगदूम (ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव-खेड) गुणवत्ता क्र. 14, तेज राजेश भागणे (ज्ञानदीप -भडगाव, खेड), गुणवत्ता क्रमांक 14 वा, दक्ष दिनेश गिजये (न्यू. इं.स्कूल खेर्डी), अथर्व सतीश जागदे (ज्ञानदीप -भडगाव).
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती निकाल राज्य गुणवत्ता यादी (शहरी):
नित्या संदीप फणसे (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी), आदित्य महेश दामले (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी), ललित अनंत डोळ (पटवर्धन हायस्कूल), मधुरा संजय पाटील (पटवर्धन हायस्कूल)