परटवणे-साळवी स्टॉप मार्गावर डंपरला अपघात; डंपरमधील दोघे किरकोळ जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील परटवणे ते साळवीस्टॉप जाणार्‍या रस्त्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास डंपर रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघात झाला. या अपघातात डंपरमधील दोघे किरकोळ जखमी झालेले असून त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय अर्जुन चवताल (३८,मुळ रा.आराम सध्या रा.उरण मुंबई) आणि मुन्ना प्रसाद (२८,मुळ रा.बिहार सध्या रा.उरण मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.  संजय हा आपल्या  ताब्यातील डंपर घेऊन परटवणेवरून साळवी स्टॉपच्या दिशेने जात होता. त्याच्या गाडीमध्ये मुन्ना प्रसाद होता. 

फिनोलेक्स कॉलनी येथे आला असता समोरुन येणार्‍या दुचाकीला वाचवताना त्याने डंपर रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी डंपरचे चाक गटारात गेल्याने रस्त्याच्या बाहेर जाऊन अपघात झाला. या अपघातात संजय याच्या डोक्याला मार लागला तर मुन्ना यालाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.