अज्ञात दोन चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते परटवणे रस्त्यावर चिंतामणी हॉस्पिटल जवळ अज्ञात चालकाने गायीला धडक देऊन अपघात केला. यामध्ये गाय मृत झाली. अज्ञात वाहन चालकांविरुद्ध शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी अज्ञात वाहन चालकाने साळवी स्टॉप ते परटवणे जाणाऱ्या रस्त्यावर चिंतामणी हॉस्पीटल येथील रस्त्यावर गायीला ठोकर दिली. या ठोकरीत गाय मृत झाली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल बालाजी धुमाळ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तसेच शहरानजीकच्या खेडशी गयाळवाडी फाटा येथील राजवैभवी हॉस्पीटल समोर अज्ञात टेम्पोने तीन महिन्याच्या गायीच्या वासराला ठोकर दिली. ही घटना रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये गायीचे वासरु मृत झाले. अपघात करुन खबर न देता चालकाने पलायन केले. या प्रकरणी फिर्यादी प्रतिक विलास बारदुडे (वय २६, रा. भवानी नगर-खेडशी नाका, कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर व ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.