रत्नागिरी:- शहरातील परटवणे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला, ही घटना गुरुवार 6 नोव्हेंबर रोजी रात्री 11.47 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली.
संतोष एकनाथ पाटील (56,रा.परटवणे साई मंदिर,रत्नागिरी) असे आकस्मिक मुत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाउ सुरेश पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, संतोष पाटील यांना दारुचे व्यसन होते. त्यामुळे ते एका ठिकाणी रहात नसत गेल्या 15 दिवसांपासून ते परटवणे येथे रहायला होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी ते रहात असलेल्या घराच्या पडवीच्या बाहेर बेशूध्द अवस्थेत पडलेल त्यांच्या पूतण्याला दिसून आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी संतोष पाटील यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









