पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना साहित्यक्षेत्रातील मानाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांपैकी अग्रगण्य नाव असलेले ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना साहित्यक्षेत्रातील मानाचा समजला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा “जनस्थान पुरस्कार” 10 जानेवारी रोजी जाहीर झाला आहे.

कोकणच्या साहित्य क्षेत्रासाठी, विशेषतः ‘कोमसाप’परिवारासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्याध्यक्षा सौ. नमिता कीर यांनी व्यक्त केली आहे. 

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे “को.म.सा.प.” परिवार, तसेच साहित्य क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.