पत्रकार राजेश कळंबटे यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराची घोषणा 

रत्नागिरी:- रत्नागिरीतील हरहुन्नरी पत्रकार आणि खो-खो चे राज्यस्तरीय पंच, मार्गदर्शक राजेश कळंबटे यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
 

राजेश कळंबटे मागील 15 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना देखील त्यांनी खो-खो या खेळाशी आपली नाळ जोडून ठेवली. खो-खो खेळात युवा पिढीला वाव मिळावा यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेत आहेत. खो-खो पंच म्हणून त्यांनी राज्यस्तरावर आपली छाप पाडली. 

राजेश कळंबटे यांच्या या कामाची दखल क्रीडा विभागाने घेतली आहे. जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२०-२१ मधील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराकरीता राजेश कळंबटे यांची निवड करण्यात आली आहे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणा-या मुख्य शासकीय कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.