रत्नागिरी:- पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली या रागातून तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उद्यमनगर येथे उघडकीस आली. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरानजीकच्या उद्यमनगर लेप्रसी हॉस्पिटलच्या मागे राहणाऱ्या सचिन रामचंद्र ठिक (४१) याने दि. ३१ जानेवारी ते दि. २ फेब्रुवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा प्रकार दोन ते तीन दिवसांनी उघडकीस आला. पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेल्याने आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.









