रत्नागिरी:- नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी किंवा त्यातील बाधितांना मदतीचा हात देण्यासाठी आपदा मित्रांची फळी उभी रहात आहे. सामाजिक कार्याची आवड असलेल्या ३०० जणांना योग्य प्रशिक्षण देऊन ही टीम तयार करण्याचे काम जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून २०० च्या वर तरूण पुढे आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन दिल्लीमार्फत आपदा मित्रांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ३०० सुरक्षा किट जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहेत. भविष्यात बचाव कार्यात या आपदा मित्रांची प्रशासनाना मोठी मदत होणार आहे.
चिपळुण, खेडला गेल्या वर्षी आलेल्या महापूराणे आणि भुस्खलनाने नैसर्गिक आपत्तीची तीव्रता दिसली. आपत्तीचे महाकाय संकट जिल्ह्यावर कोसळले. अचान आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रशासनासह सर्व यंत्रणा खडबडुन जाग्या झाल्या. हजारोच्या संख्येने लोक पुरात अडकली होती. भुस्खलनामुळे काही ढिगाऱ्याखाली अडकली तर काही गाडली गेली, अशी भयावह परिस्थिती होती. यावेळी यंत्रणा मदतीसाठी अपूरी पडु लागली. कोणतीही तयारी नसल्याने बचावकार्यात अनेक अडचणी आल्या. या परिस्थितीला तोंड देत मदतीसाठी शेकडो हात पुढे आले. मात्र योग्य प्रशिक्षण आणि दिशा नसल्याने अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. अनेकाना यात जीव गमवावा लागला. तेव्हा समाजिक कार्यात आवड असलेल्या आणि आपत्तीमध्ये मदत करणारे आपदा मित्रांची फळी तयार करण्याचा शासनाने निर्णय घेतला.
केंद्र व राज्य शासनाच्या यावर बैठका झाल्या. तेव्हा अशा आपत्तीमध्ये मनुष्यबळ कमी पडू नये, यासाठी हा विचार झाला आणि तेव्हा आपदा मित्रांबाबत निर्णय झाला. आपदा मित्रांना केवळ नैसर्गिक आपत्ती वेळी बोलवण्यात येणार आहे, ज्यांना सामाजिक कामांची आवड आहे, मदतीला जाऊ शकतात, जिल्ह्यातील असे ३०० आपदा मित्र निवड करण्यात येत आहे. यासाठी यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन दिल्लीमार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला तशा सूचना देण्यात आल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सामाजिक कार्यात आवड असलेल्या संस्था, नागरिक आदींना संपर्क साधला. याला चांगला प्रतिसाद मिळाला ३०० पैकी २०० च्या वर आपदा मित्र पुढे आले आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापनाकडुन दिले जाणार आहे. आपदा मित्रांच्या सुरक्षेचाही विचार झाला असून शासनाकडुन ३०० सुरक्षा किट जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाला प्राप्त झाले आहेत.