नेवरे येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची  वनविभागाकडून सुटका

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली. यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

नेवरे येथे बिबटय़ा फासकीत अडकला होता. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिल्यावर  त्यांनी भ्रमणध्वनी वरून परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना  तत्काळ  कार्यवाही करण्याचे आदेश दिले.  तदनंतर परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी व स्टाफ मौ. नेवरे येथे जावून खात्री केली असता बिबट्या फसकीत अडकलेला दिसून आला. कटरच्या सहाय्याने फसकी तोडून बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली. बिबट्यास पिंजऱ्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी यांचे कडून तपासणी करून घेतली व तदनंतर सदर बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडले. सदरचे रेस्क्यू ऑपरेशन हे  मा.  विभागीय वन अधिकारी रत्नागिरी दिपक  पोपटराव खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्रीम. प्रियंका पंढरीनाथ लगड, वनपाल पाली गौ. पि. कांबळे, वनरक्षक जाकदेवी म.ग. पाटील, वनरक्षक रत्नागिरी श्रीम. मि. म. कुबल, वनरक्षक कोर्ले श्री. सा. रं. पताडे यांनी पार पाडली.