रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी त्यांचे जिल्ह्यात स्वागत केले.
छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्त असलेले श्री. बगाटे यांची रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. शनिवारी रत्नागिरीत दाखल झालेल्या श्री.बगाटे यांनी पोलीस अधीक्षक पदाची सुत्रे हाती घेतली.
नितिन बगाटे हे डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.