रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून नव्याने नियुक्ती मिळालेले डॉ. मोहित कुमार गर्ग रत्नागिरीत दाखल झाले आहेत. आज (मंगळवारी) दुपारी ते रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची नुकतीच जळगाव येथे बदली झाली. त्यांच्या जागी गडचिरोली जिल्ह्यात अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत डॉ. मोहित कुमार गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली. मूळचे पंजाब मधील संगरूर जिल्ह्यातील डॉ. गर्ग हे 2014 च्या बॅचमधील आयपीएस आहेत. जुलैमध्ये त्यांची पोस्टींग गडचिरोली येथे झाली होती.
सोमवारी मध्यरात्री डॉ. मोहित कुमार गर्ग रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. मंगळवारी दुपारी ते जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे वृत्त आहे.









