निवे बुद्रुकमध्ये तरुणाचा झोपेच्या गोळ्या, गवत मारण्याच्या औषधासह फिनेल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

संगमेश्वर:- निवेबुद्रुक (ता. संगमेश्वर) येथील तरुणाने मानसिक आजाराला कंटाळून झोपेच्या गोळ्यांचा डोस, गवत मारण्याचे औषध व फिनेल प्राशन केले. उपचारासाठी त्याला देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

लखन वसंत सुर्वे (वय ३०, रा. निवेबुद्रुक ता. संगमेश्वर) असे गवत मारण्याचे औषध, फिनेल आणि झोपेच्या गोळ्यांचा डोस घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) सकाळ दहाच्या सुमारास निवेबुद्रुक येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लखन हा गेली चार वर्षे मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्याच्यावर देवरुख येथे उपचार सुरु होते. बुधवारी घरी असताना सकाळी मानसिक तणावात येऊन त्याने झोपेच्या गोळ्यांचा जादा डोस घेतला, गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले, तसेच फिनेल ही प्राशन केले. नातेवाईकांनी तात्काळ त्याला देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहे. जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या बाबत नोंद करण्यात आली आहे.