रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे दोन कारमध्ये समोरासमोर धडक होउन झालेल्या अपघातात 9 जण जखमी झाले.
अपघाताची ही घटना गुरुवार 7 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
विमल शिंदे (65), प्रणाली शिंदे (23), जगन्नाथ दिनकर पाटील (45), निलेश शिंदे (34), शुभांगी जाधव (39), जयश्री पाटील (42), अविनाश पाटील (9), तनिष्का पाटील (10) आणि ध्रुवराज शिंदे (9, सर्व रा. बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली) अशी अपघातातील 9 जखमींची नावे असून त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व जखमी स्कॉर्पिओ (एमएच-42-क्यु-4441) मधून गणपतीपुळेहून येत होते. त्याच सुमारास समोरुन येणार्या महिंद्रा (एमएच-05-डीएस-6739) कारची समोरासमोर धडक होउन हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथील जखमींना नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. आणि वाहतुक सुरळीत केली.