निवळी येथे कामगाराचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी येथील शांती धाब्यावरील कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना रविवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा.घडली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

निलेश गोपाळ आंबेकर (37, रा.भोके, आंबेरवाडी, रत्नागिरी) असे आकस्मिकम मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी 9 वा. सुमारास निलेश हा शांती धाबा येथे कामाला आला होता. त्यानंतर 11 वा. सुमारास तो धाब्याच्या बाजुला असलेल्या शौचालयात गेला होता. तो बराच वेळ झाला तरी कामाला न आल्याने धाब्यातील इतर कामगार त्याचा शोध घेत असताना तो शौचालयात बेशूध्द अवस्थेत पडलेला दिसून आला. त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.