निवळी येथे अपघात; टॅन्कर चालकविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड ते निवळी जाणाऱ्या रस्त्यावर रावणंगवाडी-तिसंग येथील वळणावर गॅस टॅन्कर पलटी झाला. टॅन्कर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश्चंद्र राजकुमार पटेल (रा. जीरकप, पो. बरदिपार, ता. मच्छीशहा जि. जवतपूर-उत्तरप्रदेश) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ४) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालक हे ग्रॅस टॅन्कर (क्र. टीएन ८८ एल-९६६१) घेऊन जयगड ते बेंगलोर असा जात असताना निवळी येथील रावणंगवाडी-तिसगी रस्त्यावरील वळणावर टॅन्कर निष्काळजी पणे चालवून अपघात केला. या प्रकरणी पोलिस पाटील भालचंद्र शितप यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात क्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.