निवळी घाटात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी घाट येथे कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. अपघात होताच या गाडीला आग लागली. ही घटना गुरुवारी (ता. ८) रात्री नऊच्या सुमारास घडली.

या ट्रकच्या पाठोपाठ देवरुख बसमध्ये प्रवास करणाऱे प्रवासी ओंकार सावंत, सुयोग सावंत यांच्या समोरच गाडीला आग लागली कळताच त्यांनी तात्काळ त्यांना बस मधून उतरुन घटनास्थळी धाव घेतली व ओंकार सावंत यांनी एमआयडीसी अग्नीशमन दलाला संपर्क केला.

संबंधिक अधिकारी विवेक राणे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोचून ती आग नियंत्रणात आणली. ट्रक ला लागलेल्या आगीची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. यावेळी रमित सावंत अनिकेत सावंत, राजू निवळकर, संतोष मेस्त्री व अन्य गावातील व्यक्ती उपस्थित होते.