रत्नागिरी:- प्रत्येक घरामध्ये वापरात नसलेल्या अनेक वस्तू तशाच पडून असतात. अशा प्रकारच्या जुनी भांडी, जुनी पुस्तके, जुने वापरण्यायोग्य कपडे व चप्पल तसेच ई-कचरा आणि निरुपयोगी प्लास्टिकच्या वस्तू स्विकारणारे आर.आर.आर. केंद्र रत्नागिरी नगर परिषदेत सुरू झाले आहे. 20 मे पासून सुरू झालेले हे केंद्र 25 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 व ‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत ‘मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी नगर परिषदेने या आर.आर.आर. केंद्राची स्थापना केली आहे.
मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. या केंद्रात येणार्या वस्तू गरजवंतांना पुरवल्या जाणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 2 वा. पर्यंत या केंद्रावर वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत.









