नियोजनाअभावी रनपच्या अनेक योजना ठप्प होण्याची भीती

माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांचा गंभीर आरोप 

रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे काम नियोजन शुन्य आणि पालिकेची वाताहत करणारे आहे.पालिकेची नवीन इमारत, सुधारित पाणी योजनेतील वाढीव रक्कम, १२३ कोटीचा नवीन डीपीआर (डीटेल प्रोजेक्ट रिपोर्ट), ८४ कोटीचा रोड कॉंक्रिटीकरण या योजनेतील १५ टक्के हिस्सा पालिकेला भरावा लागणार आहे. ती रक्कम ५० कोटीच्यावर असून पालिकेचे वार्षित उत्पन्न फक्त ७ कोटी आहे. पालिका हिस्स्याची ही रक्कम भरणे शक्य नाही. त्यामुळेया योजना ठप्प होण्याची शक्यता आहेत. सत्ताधाऱ्यांना माझे खुले आव्हान आहे की,  त्यांनी कधीही या मुद्द्यावर माझ्याशी जनतेच्या व्यासपिठावर आमने-सामने यावे, असे रोखठोक प्रतिपादन माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.श्री. कीर म्हणाले, काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी पालिकेत बैठक घेतली होती. तेव्हा पालिकेच्या नवीन इमारतीला मंजूरी मिळाली आहे. १४ कोटीची ही इमारत असून त्याला वैशिष्टपुर्ण निधीतून ५ कोटी रुयपे पालिकेला मिळाले आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना हे माहित नाही, की नगरविकस खात्याने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की. उर्वरित ९ कोटीचा निधी पालिकेने स्वतःच्या फंडातून द्यायचा आहे. म्हणजे हा ९ कोटीचा जादा भार पालिकेवर आहे. पालिकेला ६३ कोटीची सुधारित पाणी योजना  ८० कोटीवर गेली आहे. त्याचा पालिकेचा हस्सा १८ कोटी आहे. पालिकेचा नवीनडिपिआर १२३ कोटीचा आहे. तसेच ८४  कोटीच्या रस्ते कॉंक्रिटिकरण आहे. या दोन्ही कामांमध्ये पालिकेला आपला १५ टक्केचा हिस्सा भारावा लागणार आहे. एकुणच पालिकेला ५० कोटीच्या वर स्वतःच्या हिस्स्यापोटी भरावे लागणार आहेत.  मात्र पालिकेची आता तशी आर्थिक परिस्थिती नाही. पालिकेचे वार्षिक उत्पन्न ७ कोटीच्या दरम्यान आहे आणि पालिकेला १५ टक्के हिस्स्यापोटी ५० कोटीच्यावर भरावे लागणार आहे.

पालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने सत्ताधाऱ्यांनी स्वतःची आणि नागरिकींची दिशाभूल करीत आहे. पालिकेच्या नियोजन शुन्य कारभारामुळे या सर्व योजना ठप्प होण्याची शक्यता आहे. माझे सत्ताधाऱ्यांना खुले आव्हान आहे, की त्यांनी या मुद्द्यावर माझ्याशी जनतेच्या व्यासपिठावर कधीही चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी माझे हे मुद्दे खोडुन दाखवावे, असे आवाहन श्री. कीर यांनी केले.