रत्नागिरी:- राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. यांना उदय सामंत सध्या राज्याच्या राजकीय पटलावर प्रथम क्रमांकावर काम करत आहेत. आज त्यांचा वाढदिवस असून जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम राबवत त्यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. ना. उदय सामंत हे रत्नागिरीचे कणखर नेतृत्व असून आज महाराष्ट्र सरकार मध्ये पहिल्या ओळीत काम करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली असून उपक्रम जे समाजाच्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत अशा उपक्रमांच्या माध्यमातून पालकमंत्री ना.उदय सामंत यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या रत्नागिरी संगमेश्वर मतदार संघात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. अनेक नेते मंडळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करून आपला वाढदिवस साजरा करत असतात. मात्र आपल्या लाडक्या नेत्याची वेगळी दूरदृष्टी पाहून समाजाच्या उपयोगासाठी विविध कार्यक्रम करून या ठिकाणी पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या वतीने प्रत्येक विभागात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, गरजूना ब्लँकेट वाटप, रुग्णाना फळ वाटप, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम ग्रामीण भागात केले जाणार आहेत.
राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या राजकीय कारकीर्द तिला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. 25 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये अनेक माणसे तसेच कार्यकर्ते त्यांनी जोडली आहेत. त्यांना संपूर्ण मतदारसंघातून तसेच ग्रामीण भागातून अनेक लोक चाहते झाले आहेतच मात्र त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी कमान ही निर्माण केली आहे. त्यांचा वाढदिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साजरा केला जातोय. पण महत्त्वाचं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात येणार आहे.
मंगळवारी श्री. देव भैरी चरणी ना. उदय सामंत यांना दीर्घायुष्य मिळो म्हणून अभिषेक व प्रार्थना करण्यात येणार आहे. खन्ना झोपडपट्टी भगवती बंदर येथे अन्नदान वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा शासकीय हॉस्पिटल येथे फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रिमांड होम रत्नागिरी येथे मुलांना खाऊ चॉकलेट व बिस्किटे वाटप करण्यात येणार असून हे कार्यक्रम शहर प्रमुख बिपीन बंदरकर, महिला शहरप्रमुख स्मितल पावसकर, अभिजित दुडे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नियोजन केले आहे. महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे, दीपक पवार, सौरभ मलुष्टे यांच्या माध्यमातून मुलासाठी फनिगेम्स, आणि दामले विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुस्तके आणि खेळणी वाटप केली जाणार आहेत.
हातखंबा विभागात विभाग प्रमुख सचिन सावंत आणि त्यांच्या विभागातील पदाधिकारी यांच्या माध्यमातून तालुकास्तरीय कब्बड्डी स्पर्धा होणार आहेत. पाली येथे रक्तदान शिबीर, तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने विविध मनोरंज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोतवडे विभागात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम करण्यात येणार आहे. वाटद जिल्हापरिषद गटात जिल्हास्तरीय हॉलिबॉल स्पर्धा, शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे फळवाटप, खंडाळेश्वरच्या मंदिरात पालकमंत्री उदय सामंत यांच्या दीर्घआयुष्य साठी प्रार्थना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. करबुडे जिल्हा परिषद गटात प्रवीण पांचाळ यांच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी करबुडे हायस्कुल येथे मुलांना खाऊ वाटप, जाकादेवीत रुग्णालयात फळवाटप, बोड्ये ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबीर, आणि किर्केट स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. हरचेरी गटातील शाळेतील विद्यार्थ्यांना फळवाटप कार्यक्रम करण्यात येणार आहे. नावडी जिल्हा परिषद गटात फळवाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, जमूरत अलजी यांच्या माध्यमातून गरजूना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पावस विभागात आमदार चषक कबड्डी स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे. तालुका महिला वर्गाकडून माहेर संस्थेमधील अनाथ लोकांना साहित्य वाटप करून पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. रवींद्र नगर कुवारबाव समर्पण ग्रुप आणि वॉर्ड नंबर ५ चे कार्यकर्ते यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चषक भव्य ओपन क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ऍक्वा टेक्निस स्वीमिंग अकॅडमीच्या माध्यमातून भव्य जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी या संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आणि विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजित करण्यात आले आहे. युवा सेनेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. अनेक लोकांनी यामध्ये रक्तदान केले. कडवई येथील हायस्कुल मध्ये सिद्धेश ब्रीद यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्ताने १० संगणक देण्यात आले असून त्या संगणक कक्षाचे उदघाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. फुणगूस गणात महेश देसाई यांच्या माध्यमातून रुग्णालयात फळ वाटप आणि भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. असे विविध कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मतदार संघात केले जाणार आहेत.