ना. उदय सामंत यांची शिवसेना प्रवक्तेपदी निवड

रत्नागिरी:- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांची शिवसेनेच्या प्रवक्ते पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच या नियुक्तीची घोषणा करण्यात आली असून या निवडीनंतर कोकणातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. 
 

शिवसेनेच्या मुख्य प्रवक्ते पदावर खासदार संजय राऊत यांची तर प्रवक्ते म्हणून ना. सामंत यांच्यासह दहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ना. सामंत यांच्यावर पक्ष नेतृत्वाने उपनेते पदाची जबाबदारी सोपवली होती. या नंतर राज्य मंत्रीमंडळात उच्च व तंत्र शिक्षण खात्याची कॅबिनेट पदाची जबाबदारी देऊन कोकणचा सन्मान केला होता. आता ना. उदय सामंत यांच्या खांद्यावर प्रवक्ते पदाची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.