नातूवाडी धरणातील पाणीसाठा निम्म्यावर

खेड:- जून मध्ये पाऊस समाधानकारक न बरसल्याने तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठा घटला आहे. पावसाअभावी पाणीसाठा कमी होत चालला असून, त्याचा परिणाम धरणातील साठ्यावर होत झाला आहे खेडमधील नातूवाडी धरणातील साठा जुलै अखेरपर्यंत पुरेल असे चित्र आहे; परंतु उर्वरित दोन धरणांमध्ये साठ्यात घट झालेली झाली आहे.ही बाब चिंता वाढवणरी ठरत आहे

गेल्या वर्षीच्या तुलनेत खेडमध्ये यावर्षी आजपर्यंत निम्म्याच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांमध्ये आगामी कालावधीत पुरेसा पाणीसाठा होईल का? याबाबत चिंता व्यक्त होत आहे. तालुक्यात यावर्षी २१ जूनपर्यंत केवळ ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण निम्म्याहून अधिक घटल्याने त्याचा थेट परिणाम तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावर झालेला दिसून आला आहे

खेड तालुक्यातील लघुपाटबंधारे शिरवली धरणक्षेत्रात सध्या पाणीपातळी ३५.६६ मीटर इतकी असून, धरणांमध्ये ०.८०५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.धरणक्षेत्रात आतापर्यंत ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील खोपी पिंपळवाडी धरण प्रकल्पामध्ये पाण्याची पातळी ११५.५९ मिटर असून उपयुक्त पाणीसाठा ८.२१४ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. या धरणक्षेत्रात ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर तालुक्यातील नातूवाडी धरण क्षेत्रामध्ये सर्वाधिक ७८ मिमी पावसाची नोंद झाली असून धरणात ६.२३६ दशलक्ष घनमीटरएवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणातील पाणीसाठ्याचा उपयोग जुलै अखेरपर्यंत करता येऊ शकतो, अशी माहिती उपविभागीय अधिकारी स. सि. गोसावी यांनी दिली आहे.
खेड तालुक्यात गतवर्षी २१ जून २०२२ पर्यंत १०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी २१ जूनला केवळ ६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.