रत्नागिरी:- नाचणे सुपलवाडी स्टॉप येथे खड्डा चुकविताना दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. योगेश राजेश कांबळे (३२, रा. परटवणे, रत्नागिरी) असे जखमी स्वाराचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ५) रात्री सव्वा आठच्या सुमारास नाचणे-सुपलवाडी स्टॉप येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार योगश कांबळे हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एएच ५८२५) घेऊन नाचणामार्गे कुवारबाव असे जात असताना सुपलवाडी स्टॉप येथे खड्डा चुकविण्याच्या नादात समोरुन येणारी रिक्षा (क्र. एमएच-०८एक्यू ८३६४) वरिल चालक अक्षय सुभाष कुलये (वय २४, रा. कुरतडे-डुगवे, रत्नागिरी) यामध्ये समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात स्वारासह रिक्षाचालकही जखमी झाला. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.