रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळील नाचणे येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी घडली आहे. रूपेश रवींद्र नेवरेकर (३८, रा. गणेश कॉलनी, नाचणे, रत्नागिरी) असे त्या तरुणाचे नाव आहे.
शुक्रवारी सायंकाळी रूपेशने अज्ञात कारणातून राहत्या घरी त्याच्या रूममधील सिलिंग पंख्याला दोरीने गळफास घेतला. ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









