रत्नागिरी:- विदर्भ व कोकण मार्गावर आठवड्यातून दोनदा धावणार्या नागपूर-मडगाव साप्ताहिक स्पेशलला 8 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही स्पेशल 28 फेब्रुवारीपर्यंत धावणार होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
विदर्भातून थेट कोकण मार्गावर येण्यासाठी रेल्वेगाडी नसल्याने 01139/01140 क्रमांकाच्या नागपूर मडगाव साप्ताहिक स्पेशलला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या स्पेशलला पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
1 मार्च ते 7 जून या कालावधीत दर बुधवार व परतीच्या प्रवासात 2 मार्च ते 8 जूनपर्यंत दर गुरूवार व रविवार धावेल. 22 डब्यांच्या या स्पेशलला वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवीम, करमाळी आदी स्थानकात थांबे आहेत.