रत्नागिरी:- रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान ४३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष यशवंत हरमले (वय ४३, रा. नाखरे, भगवतीवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
संतोष हरमले यांना घरी असताना अचानक चक्कर आली आणि त्यांना उलट्या व जुलाब सुरू झाले. त्यानंतर त्यांना तातडीने पावस येथील डॉ. तेडुलकर यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. उपचारानंतर घरी नेल्यावर त्यांना पुन्हा उलट्या व जुलाब सुरू झाले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल मधील आय.सी.यु. विभागात उपचार सुरू असताना त्यांचे दुर्दैवाने निधन झाले.
या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.









