नांदेडच्या तरुणाची रत्‍नागिरीत आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील नुतननगर येथे नांदेड येथील तरुणाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वा. सुमारास उघडकीस आली.

ज्ञानेश्वर शिवराम वरपडे (22 मुळ रा. नांदेड सध्या रा.नुतननगर,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर शिक्षणासाठी रत्नागिरी येथे भाड्याने रहात होता. गुरुवारी दुपारी त्याने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब त्याच्या सोबत राहणार्‍या इतर सहकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.