Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी नव्या बसस्थानकासमोर एसटीच्या चाकाखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू

नव्या बसस्थानकासमोर एसटीच्या चाकाखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरीतील एसटी महामंडळाच्या नव्या बसस्थानका समोर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. बसस्थानकात येणाऱ्या एसटीने वृद्धाला धडक दिली. या अपघातानंतर वृद्ध एसटीच्या मागच्या चाकाखाली येऊन चिरडल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

बापू कोंड्या आखाडे (वय ५५, रा. जाकादेवी, रत्नागिरी) असे संशयित एसटी चालकाचे नाव आहे. वृद्ध प्रवासी कमलाकर बाबाजी चव्हाण (वय ८२, रा. चव्हाणवाडी, जुवे, रत्नागिरी) हे सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत आले होते. बसस्थानकासमोरिल मेडिकल मधून आपल्या आजारपणाच्या गोळ्या घेऊन ते घरी जाण्यासाठी नवीन एसटी डेपोत जात होते. त्याचवेळी
बसस्थानकात येणाऱ्या एसटीने त्यांना धडक दिली. बसची मागची चाके त्यांच्या पायावरून गेली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा या दरम्यान मृत्यू झाला.