रत्नागिरी:- गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. तालुक्यातील वरवडे येथील मंडळाचे या वर्षी २५ वे वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक , सांस्कृतिक , सामाजिक कार्यक्रम हाती घेण्यात आले असून रौप्य महोत्सवी वर्ष जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे.
मागील २४ वर्षा पासून अनेक भक्तांच्या नवसाला पावणारी , सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून वरवडेत प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या देवीकडे पाहिले जाते. यावर्षी या दुर्गा मातेच्या नवरात्र उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. रौप्य महोत्सवी वर्ष जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय वरवडे गावातील ग्रामस्थांनी घेतला असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. या निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
नऊ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात शनिवार १४ ऑक्टोबर रोजी देवीचे मिरवणुकीने आगमन होणार आहे. रविवार १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना आणि दुपारी महाप्रसाद तर रात्री आठ वाजता भजन आणि दहा वाजता मंगळागौर कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सोमवार १६ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार १७ रोजी रक्तदान शिबिर आणि रात्री गरबा, दांडिया नृत्य स्पर्धा होणार आहे. गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी दुर्गामाता जागरण गोंधळ आणि रात्री दांडिया नृत्य होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी महिला हळदीकुंकू कार्यक्रम होणार आहे. शनिवार २१ ऑक्टोबर रोजी सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली आहे. रविवार २२ रोजी दुपारी महा प्रसाद आणि रात्री भजन कार्यक्रम होणार आहे. सोमवार २३ ऑक्टोबर रोजी भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारी दुर्गामाता विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे.









