रत्नागिरी:- बुधवारी सकाळी 6.30 वा.सुमारास नरबे फाटा येथे ट्रक आणि टेम्पोमध्ये धडक होउन झालेल्या अपघातातील गंभिर जखमी मुज्जफीर अमजत जांभारकर (24) तरुणाचा कोल्हापूरला पोहचल्यावर मृत्यू झाला. परंतू त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुन्हा रत्नागिरीत आणण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुज्जफीरच्या पायाला गंभिर दुखापत झाली होती.कोल्हापूर येथे अधिक उपचारांसाठी मुज्जफीरला नेण्यात येत असताना त्याचा कोल्हापूरला पोहचल्यावर तेथील रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाला हे कोणी घोषित केले.रुग्णवाहिका चालकाने त्याला तेथील रुग्णालयात का दाखल केले नाही. तेथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार झाले असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या अपघातातील फिरदोस न्यायत खले (40) आणि अमजत आलेमिया जांभारकर (50,दोन्ही रा.पडवे गुहागर,रत्नागिरी) या दोघांवर उपचार सुरु असून या अपघात प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.