रत्नागिरी:- नदीत आंघोळ करुन रिक्षा घेऊन घरी येत असताना रिक्षा पलटी होऊन तिघेजण जखमी झाले तर या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
परशुराम शिवाराम पाताडे (वय ३५, रा. कुणबीवाडी, संगमेश्वर) असे अपघातात ठार झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. ही रविवारी (ता. १२) पावणे सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार परशुराम पाताडे हे रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ५८४८) घेऊन सोबत वैभव खर्डे, दिगंबर सनगरे, अविनाश खापरे यांना घेऊन नदीवर आंघोळ करण्यासाठी गेले होते. आंघोळ झाल्यानंतर तळी ते वांद्री असे जात असताना सप्तलिंगी पुलावर रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षा चालक परशुराम पाताडे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर वैभव, दिगंबर, अविनाथ हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वांद्री येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. अपघाताची नोंद येथील जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकित करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस संगमेश्वर अमंलदार करत आहेत.