रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, खेड, लांजा, राजापूर नगरपरिषदांमधील राज्य सेवा संवर्गातील कर्मचार्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. यामधील रत्नागिरी नगरपरिषदेतील 3, चिपळूणातील 4, खेडमधील 1, गुहागर नगरपंचायतीतील एका कर्मचार्याची बदली झाली आहे. रनपतील भांडार विभागाचे मनीषकुमार बारये यांची रायगडातील म्हसळा नगरपरिषदेत तर संगणक अभियांत्रिकी सेवेतील गायत्री मांडवकर यांची कोल्हापूरातील वडगाव आणि विद्युत विभागाचे अभियंता विष्णूकुमार शिवशरण यांची पुण्यातील आळंदी नगरपरिषदेत बदली झाली आहे.
नगरपरिषद राज्यसेवा संवर्ग कर्मचार्यांच्या 2022-23 या वर्षातील सर्वसाधारण बदल्यांचे नगरविकास मंत्रालयाकडून आदेश निघाले आहेत. त्यानुसार रत्नागिरी नगर परिषदेला स्थापत्य संवर्गातील ’अ’ श्रेणीचे अभियंता मिळाले आहेत. संजय बागडे असे या अभियंत्याचे नाव असून ते इच्चलकरंजी नगरपरिषदेतून रत्नागिरी नगरपरिषदेत येणार आहेत. त्याचबरोबर सातार्यातील लेखापाल कल्याणी भाटकर यांचीही रत्नागिरी नगरपरिषदेत बदली झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रनपला नियमित लेखापाल नव्हते. सध्या राजापूर न. प. चे लेखापाल श्री. फोडकर यांच्याकडे रनप लेखापालचा कार्यभार होता. आठवड्यातून दोन दिवस ते रत्नागिरी नगरपरिषदेला सेवा देत होते.
चिपळूणातील कर निर्धारक अनंत मोरे यांची रायगडातील महाड न.प. मध्ये प्रमोद ठसाळे यांची रोहा तर अनिल राजेशिर्के यांची गुहागर नगरपंचायतीत बदली झाली आहे. चिपळूण न. प. च्या संगणक अभियांत्रिकी सेवेतील रोहिणी कांबळे यांची खेड नगर परिषदेत बदली झाली आहे. लांजा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंता सोनाली खैरे यांची सिंधुदुर्गातील मालवण नगरपरिषदेत तसेच राजापूर न. प. तील प्रियांका कदम यांची ठाणे – बदलापुरातील कुळगाव न. प. मध्ये बदली झाली आहे.









