नगर परिषदेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी नोंदवला चित्रकला स्पर्धेत सहभाग

परकार हॉस्पिटल व मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी:- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत- पंतप्रधान जन आरोग्य योजना या सुरक्षा योजनेची ४ वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने परकार हॉस्पिटल रत्नागिरी आणि मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नगर परिषद शाळांसाठी रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ येथील दामले विद्यालयात करण्यात आले होते.

यावेळी डॉ अलिमिया परकार, शिक्षणाधिकारी सुनील पाटील, मुख्याध्यापक जाधव, मराठी पत्रकार परिषदेच्या जान्हवी पाटील, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र नाचणकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश शेळके, तालुकाध्यक्ष आनंद तापेकर, माजी अध्यक्ष हेमंत वणजू, मुश्ताक खान, प्रसिद्धी प्रमुख, सचिव जमीर खलिफे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अनुराधा लेले यांनी केले.

उज्ज्वल भारत घडवण्याचे सामर्थ्य हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम नेहमीच घेण्याचा आमचा प्रयत्न असतो अशी प्रतिक्रिया डॉ अलिमिया परकार यांनी व्यक्त केले.
परकार हॉस्पिटल आणि मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमाचे शिक्षणाधिकारी सुनील पाटील यांनी कौतुक केले, मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम घेणे आवश्यक असते त्यामुळे असेच अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेण्यात यावे यासाठी आवश्यक सहकार्य आपण करू असेही त्यांनी सांगितले.

या रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेत नगर परिषद शाळांमधील जवळपास ९०० विद्यार्थी सहभागी झाले होते शहरातील १८ शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ २९ सप्टेंबर रोजी पार पडणार असल्याची माहिती डॉ अनुराधा लेले यांनी दिली.