नगरपरिषदेच्या डंपरने दोन रिक्षाना दिली धडक; डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान

रत्नागिरी:- शिवाजीनगर येथील रिलायन्स मॉलच्या बाहेर सिद्धिविनायक नगर येथे नगर परिषदेच्या डंपरने दोन रिक्षांना ठोकर देऊन रिक्षांचे मोठे नुकसान केले आहे.

अपघातानंतर या डंपरने इलेक्ट्रिकच्या दोन खांबांना ठोकर देऊन साउथ इंडियन बँकेच्या गेट समोर ही गाडी धडकली. दुपारची वेळ असल्यामुळे सुदैवाने वाहतूक थोडी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

या ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात रिक्षा उभ्या असतात. मात्र अपघातवेळी केवळ दोनच रिक्षा याठिकाणी उभ्या होत्या. यामध्ये एका रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नगरपरिषदेच्या डंपरचे स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.