ध्वजस्तंभ विजेच्या डीपीवर पडल्याने रुग्णालयातील तिघेजण जखमी

रत्नागिरी:- शहरातील लोटलीकर हॉस्पिटल येथे ध्वजस्तंभ उभारताना दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीनजण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून इतर दोघांची प्रकृती स्थिर आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मारुती मंदिर येथील लोटलीकर हॉस्पिटल आवारामध्ये ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू होते. ध्वजस्तंभ खड्ड्यांमधून बाहेर काढताना त्याचा तोल जाऊन तो त्याच आवारातच असणाऱ्या महावितरणच्या डीपीवर पडला. यात विजेचा जोरदार झटका सुधीर पवार यांना बसला आणि ते गंभीर जखमी झाले तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.